शहरं
Join us  
Trending Stories
1
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
2
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
3
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
4
Diesel Price Hike: युद्धाचा परिणाम, 'या' डिझेलच्या दरात २८ रुपयांची वाढ; पाहा कोणावर पडणार आर्थिक भार
5
मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
6
अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
7
सौदी आता अमेरिकेपासून चार हात लांब; मोहम्मद बिन सलमान यांचा पुतिन यांना फोन, राजकीय पट बदलणार!
8
बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!
9
फलंदाजीत कमाल, पण बोलंदाजी नडली, आक्षेपार्ह शेरेबाजीमुळे अभिषेक शर्मावर BCCI ने केली कठोर कारवाई 
10
कोण आहेत १६७ कोटींची पेटिंग खरेदी करणारे सायरस पूनावाला? 'वॅक्सिन किंग'च्या नावानं आहेत प्रसिद्ध, नेटवर्थ किती?
11
पाकिस्तानात तेलाचा भडका! पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, जनतेला वाऱ्यावर सोडून US ला करतोय पुरवठा? होतेय भारताशी तुलना
12
नमिता थापर यांच्या 'एमक्योर'चा मास्टरस्ट्रोक! वजन कमी करण्याचे इंजेक्शन ५५% स्वस्त, नवीन किंमत आवाक्यात
13
नराधमपणाचा कळस! मुलाचा आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी; आईनेच आवळला गळा
14
Gold Silver Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले; लग्नसराईच्या काळात खरेदीची उत्तम संधी?
15
पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर
16
लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!
17
मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप 
18
हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप
19
OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन
20
"आम्हाला वाटलं फटाके फुटतायत, पण..."; चिमुरडीच्या डोक्यात घुसली गोळी! गँगवॉरने घेतला निरागस जीव
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात; शिंदेसेनेच्या संपर्कातील दोघांवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 05:59 IST

उद्धवसेनेचे ११ वरून झाले ७ नगरसेवक

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक पळवापळवीच्या गोंधळानंतर मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. उद्धवसेनेचे दोन नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असताना नाट्यमय घडामोडींनतर पुन्हा २ नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उद्धवसेनेची नगरसेवक संख्या ११ वरून आता ७ वर घसरली आहे.

उद्धवसेनेने ७ जणांच्या गटाची नोंदणी मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे, तसेच शिंदेसेनेच्या संपर्कातील दोघांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असेही पत्र दिल्याची माहिती जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले. ११ पैकी २ नॉट रिचेबल होते. गटनेता निवडीच्या सोमवारच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली. उद्धवसेनेचे संख्याबळ आता ११ वरून ७ वर आले आहे, तर उद्धवसेनेच्या स्वप्नाली केणे आणि राहुल काेट मनसेच्या गोटात गेल्याने मनसेचे संख्याबळ ५ वरून ७ झाले आहे. हे दोघेही नगरसेवक मूळचे मनसेचे आहेत. ते मंगळवारी गट स्थापनेसाठी कोकण भवन कार्यालयात गेले नाहीत.

दोघांची बैठकीला दांडी

उद्धवसेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि ॲड. कीर्ती ढोणे यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. शिंदेसेनेने तिकीट नाकारल्यानंतर म्हात्रे यांनी उद्धवसेनेचे तिकीट मिळविले. त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या घराबाहेर भिंतीवर पक्षाच्या बैठकीची नोटीस लावली होती. 

उद्धवसेनेचे ११ वरून झाले ७ नगरसेवक

  • उद्धवसेनेचे विजयी नगरसेवक- ११
  • शिंदेसेनेच्या संपर्कात- ०२
  • मनसेच्या गोटात- ०२
  • उद्धवसेनेकडून गट स्थापन- ०७

शिंदेसेना-उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

शिंदेसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी उद्धवसेनेचे जिल्हाधिकारी शरद पाटील यांची मंगळवारी भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, पाटील आणि गायकवाड यांनी ही भेट कौटुंबिक आणि मैत्रीपूर्ण होती. त्याचा राजकीय घडामोडींशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

उमेश बोरगावकर उद्धवसेनेच्या गटनेतेपदी

उद्धवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेले उमेश बोरगावकर हे आधी राष्ट्रवादीत (अजित पवार) होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मात्र, ते ज्या प्रभागातून इच्छुक होते. तेथून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी ऐनवेळी उद्धवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. ते आता महापालिकेत गटाचे नेतृत्व करणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Corporators Defect to MNS; Action Demanded on Shinde Camp Links

Web Summary : Two Uddhav Sena corporators joined MNS, reducing Uddhav's strength. Action sought against corporators linked to Shinde Sena. Political meetings spark discussions.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना