कल्याणमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:33 IST2022-04-07T14:32:52+5:302022-04-07T14:33:21+5:30
पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणी आयपीएलची टी-20 मॅच सुरु होती.

कल्याणमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड
कल्याण - आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील बोरगांवकर कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणी आयपीएलची टी-20 मॅच सुरु होती. आरसीबी आणि आरआर या दोन संघामध्ये सुरु असलेल्या मॅचवर सट्टा लावला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईत येथील मुलुंडमध्ये राहणारा भावेन अमन आणि मुलुंड येथे राहणारा मयुर ब्यास या दोघांना अटक केली आहे. दोघांकडून ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना आरोपी केले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आाहे.