कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले

By मुरलीधर भवार | Updated: December 1, 2023 20:16 IST2023-12-01T20:14:29+5:302023-12-01T20:16:09+5:30

स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

Toy businessman strangles wife and son in Kalyan; Ended himself | कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले

कल्याणमध्ये खेळणी व्यावसायिकाने पत्नी आणि मुलाची गळा दाबून केली हत्या; स्वत:लाही संपवले

कल्याणमध्ये एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव आहे. त्याची कल्याण शहरात नानू वर्ल्ड ही खेळण्याची दुकाने आहे. स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर तीन येथील आेम दिपावली इमारतीत दिपक गायकवाड हा त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. आज दुपारी त्याने त्याच्या भावाला फोन करुन माहिती दिली की, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली आहे. तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. याची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुलगा आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठविले. तोपर्यंत दीपक हा फरार झाला होता. दीपक  याची कल्याण शहरात नानूस वर्ल्ड ही महागड्या खेळणी विक्रीची दुकाने आहेत. दीपकने असे का केले? हे त्याच्या अटकेनंतरच उघड होणार आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Toy businessman strangles wife and son in Kalyan; Ended himself