आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या 

By अनिकेत घमंडी | Updated: July 13, 2023 19:00 IST2023-07-13T19:00:39+5:302023-07-13T19:00:57+5:30

आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकल खाली उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयाद्रावक घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात घडली.

Tired of illness, an old woman committed suicide by jumping down the premises | आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या 

आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची लोकल खाली उडी घेत आत्महत्या 

डोंबिवली : आजारपणाला कंटाळून एका वृद्ध महिलेने लोकल खाली उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयाद्रावक घटना डोंबिवलीरेल्वे स्थानकात गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रभा नांबूदिरी (५८) असे मयत महिलेचे नाव आहे. पश्चिमेकडील कर्वे रोड परिसरात ही महिला राहत होती. 

गेल्या अनेक वर्षापासून त्या अत्सामा आजाराने त्रस्त होत्या.आजाराला कंटाळून आपण आत्महत्या केल्याची सुसाईड नोट तिच्याजवळ आढळून आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार असून वारस मिळाले असल्याचे देखील सांगण्यात आले. 

Web Title: Tired of illness, an old woman committed suicide by jumping down the premises