तीन वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण : डोळयात मिरची पूडही टाकली सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:30 IST2026-03-07T19:29:40+5:302026-03-07T19:30:50+5:30

या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने घटनेचे तीव्र पडसाद उमटले. व्हीडीओ समोर येताच पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Three-year-old girl brutally beaten: Chilli powder also thrown in her eyes, video goes viral on social media | तीन वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण : डोळयात मिरची पूडही टाकली सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल

तीन वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण : डोळयात मिरची पूडही टाकली सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल

कल्याण : कल्याणनजीक तीन वर्षीय मुलीला एका महिलेने अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणीच्या वेळी महिलेने मुलीच्या डोळ्यात मिरची पूडही टाकली. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात मारहाण करणारी महिला दिलशाद शेख हिच्यासह अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बापगाव परिसरात दिलशाद शेख या राहतात. मारहाण केलेल्या ३ वर्षीय मुलीला तिने दत्तक घेतले आहे. या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या अन्य एका महिलेस मुलगी मम्मा म्हणते. या गोष्टीचा राग मनात धरुन शेख हिने मुलीला अमानुषपणे मारहाण केली. तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. या घटनेचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने घटनेचे तीव्र पडसाद उमटले. व्हीडीओ समोर येताच पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : तीन साल की बच्ची पर महिला का अमानवीय अत्याचार, आंखों में डाली मिर्च

Web Summary : कल्याण में एक महिला ने अपनी तीन साल की गोद ली हुई बेटी को बेरहमी से पीटा और उसकी आंखों में मिर्च पाउडर भी डाला। वीडियो वायरल होने के बाद महिला और दो अन्य के खिलाफ पुलिस मामला दर्ज किया गया।

Web Title : Woman Brutally Assaults 3-Year-Old Girl, Puts Chili Powder in Eyes

Web Summary : A woman in Kalyan brutally assaulted her adopted 3-year-old daughter, even putting chili powder in her eyes. The video went viral, leading to a police case against the woman and two others.