विकास कामात टक्केवारी खाण्याची पीएचडी केलेल्यांची माझ्या विषयी बोलण्याची लायकी नाही; मनसे आमदाराचे शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 09:14 PM2022-01-07T21:14:51+5:302022-01-07T21:15:10+5:30

२७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले होते.

Those who have a PhD to eat a percentage in development work dont deserve to talk about me says MNS MLA raju patil | विकास कामात टक्केवारी खाण्याची पीएचडी केलेल्यांची माझ्या विषयी बोलण्याची लायकी नाही; मनसे आमदाराचे शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर

विकास कामात टक्केवारी खाण्याची पीएचडी केलेल्यांची माझ्या विषयी बोलण्याची लायकी नाही; मनसे आमदाराचे शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर

googlenewsNext

कल्याण-

२७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले होते. त्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या कामासाठी खाजदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यता मनसे आमदारांची पीएचडी आहे अशी टिका केली होती. त्याला आज मनसे आमदार पाटील यांनी प्रतिउत्तर देत विकास कामात टक्केवारी खाण्यात पीएचडी असलेल्यांची माङया विरोधात बोलण्याची लायकी आहे का असा सवाल असा पलटवार केला आहे. खासदार शिंदे यांनी पाठपुरावा केला नाही असे मी कुठे बोललोच नाही हा मुद्दा देखील पाटील यांनी नमूद केला.

म्हात्रे यांनी मालक व्हावे. बाऊन्सर बनून सोबत फिरु नये असा सल्लाही पाटील यांनी म्हात्रे यांना देत ठाण्याचे मालक जेव्हढे सांगतात. तितकेच हे बोलता असाही टोला लगावला आहे.

दरमयान आज विभा कंपनीच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी खासदार आणि आयुक्तांनी केली केली. त्यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, कोरोना हा आजार होता. आत्ता त्याचा बाजार झाला आहे. नवे रुग्णालय होत आहे. हे नक्कीच रुग्णांच्या फायद्यासाठी आहे. चांगल्या कामासाठी आमचा कायम पाठिंबा आणि सहकार्य राहिले आहे. मात्र कोविड सेंटर आणि रुग्णालयाचे ऑडीट होणो देखील गरजचे आहे. मागच्या वेळी जसे घोळ झाले. तसे आत्ता व्हायला नको. त्यावर आमचे आत्ता लक्ष राहिल याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

Web Title: Those who have a PhD to eat a percentage in development work dont deserve to talk about me says MNS MLA raju patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.