ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

By प्रशांत माने | Updated: November 7, 2022 22:16 IST2022-11-07T22:13:58+5:302022-11-07T22:16:05+5:30

कल्याणः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी वापरलेले अपशब्द आणि सध्या राजकीय व्यक्तिंकडून सर्रास सुरु ...

This is not our culture MNS MLA Raju Patil appealed to the ruling party and the opposition through a tweet | ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

कल्याणः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी वापरलेले अपशब्द आणि सध्या राजकीय व्यक्तिंकडून सर्रास सुरु असलेल्या बेताल वक्तव्यांचा कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी व्टिटद्वारे ही आपली संस्कृती नाही, अशी जाणीव करुन देताना राज्याच्या राजकारणाची पत मातीत जातेय याकडे लक्ष वेधले आहे.

सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारमधील नेत्यांनी देखील सत्तार यांच्या वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. या वादात आत्ता मनसेनेही उडी घेतली आहे.  इकडून कुणी तरी 'सत्तार' थातून गरळ ओकंतय. मग तिकडून कोणी तरी बेछूट बरळतय. सत्ता आली सावरा, सत्ता गेली आहे त्यांना आवरा. बेताल बोलांनी राज्याच्या राजकारणाची पत मातीत जाते. ही आपली संस्कृती नाही असे ट्विट आ. पाटील यांनी  केले आहे.
 

Web Title: This is not our culture MNS MLA Raju Patil appealed to the ruling party and the opposition through a tweet