चोरटा अवघ्या सात मिनिटात अटकेत; कोळसेवाडी पोलिसांची कारवाई
By मुरलीधर भवार | Updated: November 19, 2022 16:57 IST2022-11-19T16:57:24+5:302022-11-19T16:57:28+5:30
काल रात्री सागर आव्हाड हे कामावरुन घरी परत होते. ते कल्याण पूर्व भागतील सिद्धार्थनगर येथील शाहू गार्डनजवळ त्यांच्या मित्राची वाट पाहत होते.

चोरटा अवघ्या सात मिनिटात अटकेत; कोळसेवाडी पोलिसांची कारवाई
कल्याण- फक्त चारशे रुपये लूटण्यासाठी एकाला मारहाण करुन लूटणा:या चोरटय़ांच्या दुकलीपैकी एकाला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या सात मिनिटात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव प्रतिक कांबळे असे आहे. त्याचा साथीदार पसार झाला असला तरी त्याचा कोळसेवाडी पोलिस शोध घेत आहे.
काल रात्री सागर आव्हाड हे कामावरुन घरी परत होते. ते कल्याण पूर्व भागतील सिद्धार्थनगर येथील शाहू गार्डनजवळ त्यांच्या मित्राची वाट पाहत होते. त्याठिकाणी दोन जण आले. त्यांनी त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्ताने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सागर याने त्यांना प्रतिकार केला. सागरचा प्रतिकार पाहून दोघांनी सागरला मारहाण केली. त्याला मारहाण करुन त्याच्याकडील चारशे रुपये हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सागर याने प्रसंगावधान राखत त्याच्या मोबाईलहून कल्याण पोलिस नियंत्रण कशाला फोन केला. त्याला कोणीतरी लूटत आहे असा मेसेज दिला.
नियंत्रण कक्षातून हाच मेसेज कोळसेवाडी पोलिसाना दिला गेला. पोलिस अवघ्या सात मिनिटात घटनास्थळी पाहचले. पोलिसांनी सागरची लूट करणा:यां पैकी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव प्रतिक कांबळे असून त्याचा साथीदार बबन्या हा पसार झाला आहे. पोलिस त्याचाही शोध घेत आहेत. अटक केलेल्या एका आरोपीने हे सगळे ते दारुच्या नशेकरीता करीत होते असे सांगितले आहे.