कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:47 PM2021-05-15T18:47:52+5:302021-05-15T18:48:55+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

there will be lockdown in next 15 days in kalyan dombivli | कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन!

कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन!

Next

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने आणखीन कडक पाऊल उचलली आहे. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकांना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन त्यांची  टेस्ट करण्यात यावी  असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच येत्या 15 दिवसात केडीएमसी हद्दीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्तांनी पोलिसांना निर्देश  दिले आहेत. 

येत्या 15 दिवसात  लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत आज सकाळी, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी हे निर्देश दिले . कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. काही नागरिक विनाकारण गर्दी करतात तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी, पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यावर  सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन, तहसील कार्यालयाजवळ  व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट  केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना आयुक्त सूर्यवंशी यांनी आरोग्य विभाग व प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिल्या.  

 सकाळी  11 नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी.  वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत, याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना  देखील आयुक्तांनी  यावेळी दिल्या. 

अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले. लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्याचे पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे भाजी मार्केट चे नियोजन अन्य विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल असेही आयुक्त म्हणाले. 

सकाळी 11  नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यावर कठोर कारवाई करावी तसेच  रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Web Title: there will be lockdown in next 15 days in kalyan dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.