कल्याणच्या नववर्ष स्वागतयात्रेत घुमणार जयघोष हिंदुत्वाचा-जल्लोष कल्याणकरांचा

By प्रशांत माने | Published: March 29, 2024 05:52 PM2024-03-29T17:52:58+5:302024-03-29T17:53:58+5:30

सहा एप्रिलपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.

there are on the occasion of gudi padwa thousands of people celebrated the festival in kalyan | कल्याणच्या नववर्ष स्वागतयात्रेत घुमणार जयघोष हिंदुत्वाचा-जल्लोष कल्याणकरांचा

कल्याणच्या नववर्ष स्वागतयात्रेत घुमणार जयघोष हिंदुत्वाचा-जल्लोष कल्याणकरांचा

प्रशांत माने,कल्याण: शहरात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी (२५ वे )वर्ष असून त्यामध्ये मोठया संख्येने जयघोष हिंदुत्वाचा - जल्लोष कल्याणकरांचा पाहायला मिळणार आहे. ९ एप्रिलला गुढीपाडव्याला ही स्वागतयात्रा असलीतरी ६ एप्रिलपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा २५ वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण यांच्याकडे त्याचे आयोजनपद देण्यात आले आहे. या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढविण्यासाठी आयएमए कल्याण कडून गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सामाजिक संस्था आणि लोकसहभाग पाहता २५ हजारांच्या आसपास कल्याणकर स्वागतयात्रेत सहभागी होतील अशी माहीती आयएमएच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कल्याण संस्कृती मंचचे ऍड. निशिकांत बुधकर, खजिनदार अतुल फडके, स्वागतयात्रा समनव्यक डॉ. प्रशांत पाटील, नवनिर्वाचित सचिव डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. विकास सुरंजे यांच्यासह कल्याण संस्कृती मंच आणि आयएमएचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन-

६ एप्रिल रोजी कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती सोहळा पार पडणार आहे. ७ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान होणार असून ८ एप्रिल रोजी वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगितिक कार्यक्रम होणार आहेत. गायक नचिकेत लेले, डॉ. संकेत भोसले, कोरिओग्राफर आशिष पाटील, कलाकार आदिती सारंगधर हे युवा कलाकार त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्वागतयात्रेचे समन्वयक आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त फडके मैदानात २५ फुटांची भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे.

घुमणार जयघोष हिंदुत्वाचा जयघोष -

जयघोष हिंदुत्वाचा - जल्लोष  कल्याणकरांचा या ब्रीद वाक्याखाली स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. मुख्य स्वागतयात्रा नेहमीप्रमाणे मुरबाड रोड येथून सकाळी ६.३० वाजता निघून कमिश्नर बंगला, रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, केडीएमसी मुख्यालय, देवी अहिल्याबाई चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लालचौकीमार्गे वासुदेव बळवंत फडके मैदानात पोहोचणार आहे. तर साईचौक खडकपाडा आणि स्व. विशाल भोईर चौक उंबर्डे परिसरातून दोन नव्या उपयात्रा फडके मैदानात पारंपरिक यात्रेमध्ये जोडल्या जाणार आहेत

Web Title: there are on the occasion of gudi padwa thousands of people celebrated the festival in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण