शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाचा होणार जिर्णोद्धार; श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:57 IST2022-02-17T13:56:10+5:302022-02-17T13:57:47+5:30

शहाराजीराजे समाधी स्थळाची दुरावस्था झाल्याची बाब ज्येष्ठ इतिहास संशोधक पानिपतकार विश्वास पाटील यांनी निदर्शनास आणून दिली. याची तातडीने दखल घेण्यात आली.

The Samadhi site of Shahaji Raje Bhosale will be renovated; Shrikant Shinde Foundation took the initiative | शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाचा होणार जिर्णोद्धार; श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने घेतला पुढाकार

शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाचा होणार जिर्णोद्धार; श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने घेतला पुढाकार

कल्याण- स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाराज (Shahaji Raje Bhosle) यांच्या कर्नाटक राज्यातील समाधी स्थळांचा संपूर्ण जिर्णोद्धार करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे. पहिल्याच टप्प्यात शहाराजीराजे स्मारक ट्रस्टला पाच लाख रुपयांचा धनादेश फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

शहाराजीराजे समाधी स्थळाची दुरावस्था झाल्याची बाब ज्येष्ठ इतिहास संशोधक पानिपतकार विश्वास पाटील यांनी निदर्शनास आणून दिली. याची तातडीने दखल घेण्यात आली. पाटील यांच्या उपस्थितीत ट्रस्टला पाच लाखाचा धनादेश देण्यात आला. शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे यांच्याशी व्हिडीओ कॉलींगद्वारे संपर्क साधून हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. 

यावेळी पाटील यांच्यासह फाऊंडेशनचे सदस्य मंगेश चिवटे, बाजीराव चव्हाण, प्रशांत साळूंखे, अतुल चतुव्रेदी तसेच समाधी स्थळ ट्रस्टचे रामचंद्र राव, मंजूनाथ पवार, शामसुंदर सूर्यवंशी, अन्नोजीराव पवार, सतीश पवार, किरण शिंदे, सुदर्शन पवार, प्रशांत भोसले, गोविंदराजे भोसले आदी उपस्थित होते.
 

Web Title: The Samadhi site of Shahaji Raje Bhosale will be renovated; Shrikant Shinde Foundation took the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.