शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणूनच दोन्ही पत्नींनी विशालला सोडले, सोशल मीडियाच्या माध्यमातून साक्षीशी झाली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:09 IST

..यापूर्वीही गवळीच्या दोन पत्नी त्याच्या लैंगिक छळाला कंटाळून त्याला सोडून गेल्या. गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्यासाठी मदत न केल्यास, तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास मारून टाकण्याची धमकी विशालने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

कल्याण : गुंड विशाल गवळीची तिसरी पत्नी साक्षीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर, दोघांनी लग्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. विशाल साक्षीचा शारीरिक छळ करीत होता. यापूर्वीही गवळीच्या दोन पत्नी त्याच्या लैंगिक छळाला कंटाळून त्याला सोडून गेल्या. गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्यासाठी मदत न केल्यास, तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास मारून टाकण्याची धमकी विशालने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत, तिची हत्या करण्यात आल्याची घटना कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यानंतर, विशालने पत्नी साक्षीच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. साक्षी ही विशालची तिसरी पत्नी असून, एका खासगी बँकेत कामाला असलेल्या साक्षीला २०-२२ हजार रुपये पगार होता. 

...‘तिची’ साक्ष महत्त्वाची -  साक्षीसोबत लग्न केल्यानंतर विशालने तिचाही शारीरिक व लैंगिक छळ करायला सुरुवात केली. -  विशालच्या याच छळाला कंटाळून त्याच्या दोन पत्नी त्याला सोडून गेल्या. विशालची पहिली पत्नी ही गुजराथी होती. -  गवळीच्या अनेक कारनाम्यांची साक्षीला माहिती आहे, परंतु विशालला राजकीय दबावापोटी जामीन मिळाला, तर तो आपलीही हत्या करील, अशी भीती साक्षीला वाटते. -  मुलीच्या हत्येच्या प्रकरणात साक्षी पोलिसांकरिता साक्षीदार ठरू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस