माळशेज घाटातील भीषण अपघातात ३ ठार ३ जखमी; श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरला निघाले होते तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:32 IST2024-08-05T11:27:55+5:302024-08-05T11:32:54+5:30

माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे.

Terrible accident in Malshej Ghat; 3 killed 3 injured | माळशेज घाटातील भीषण अपघातात ३ ठार ३ जखमी; श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरला निघाले होते तरुण

माळशेज घाटातील भीषण अपघातात ३ ठार ३ जखमी; श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरला निघाले होते तरुण

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकरला जात असताना माळशेज घाटातील भोरांडे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  इर्टिगा कार संरक्षक कडा तोडून खाली झाडावर धडकली. 

या अपघातातील मृत्यू झालेल्यांमधील तरुण कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, वरप आणि गोवेली येथील आहेत.  हा अपघात रविवारी रात्री ९ च्या सुमारास घडला.

अपघातातील मृतांची नावं

नरेश म्हात्रे (31)  चिंचपाडा 

अश्विन भोईर (30) वरप

प्रतीक चोरगे (21 ) गोवेली

जखमींची नावं 

अक्षय मोंडुले - रेवती पाडा 
शिवाजी घाडगे - रेवती पाडा 
वैभव कुमावत

Web Title: Terrible accident in Malshej Ghat; 3 killed 3 injured