गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणारे दोन सराई चोरटे गजाआड

By मुरलीधर भवार | Updated: November 4, 2023 17:44 IST2023-11-04T17:43:51+5:302023-11-04T17:44:32+5:30

कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसापूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना दोन प्रवासांचे मोबाईल चोरीला गेलो होते.

Taking advantage of the crowd, two innkeepers who stole mobile phones of passengers are on the loose | गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणारे दोन सराई चोरटे गजाआड

गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणारे दोन सराई चोरटे गजाआड

कल्याण-गर्दीचा फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवासांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गौतम सिंह आणि समीर खान अशी या चोरट्यांची नावे आहेत. कल्याण रेल्वे पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

कल्याण आणि कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान काही दिवसापूर्वी लोकलमध्ये प्रवास करताना दोन प्रवासांचे मोबाईल चोरीला गेलो होते. या दोन्ही प्रवाशांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने हा तपास सुरू केला. अखेर या प्रकरणात पोलिसांना यश आले आहे.

दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. हे दोघे गर्दीच्या फायदा घेत लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचे आणि प्रवाशांचे मोबाईल चोरून पसार व्हायचे. गौतम सिंह आणि समीर खान अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्याच्या विरोधात याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची 

Web Title: Taking advantage of the crowd, two innkeepers who stole mobile phones of passengers are on the loose