रेल्वे डिझेल लोकेशेड टेक्निशियनचा संशयास्पद मृत्यू

By मुरलीधर भवार | Updated: September 22, 2023 17:46 IST2023-09-22T17:43:53+5:302023-09-22T17:46:46+5:30

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

suspicious death of railway diesel locomotive technician | रेल्वे डिझेल लोकेशेड टेक्निशियनचा संशयास्पद मृत्यू

रेल्वे डिझेल लोकेशेड टेक्निशियनचा संशयास्पद मृत्यू

मुरलीधर भवार, कल्याण-कल्याण रेल्वे कर्मचारी  क्वार्टरमध्ये राहणाऱ्या रेल्वे डिझेल लोकोशेड टेक्निशन विनोद कुमार मीना यांचा मृतदेह आज घरात आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

विनोद कुमार हे कल्याणच्या रेल्वे लोकोशेडमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. ते रेल्वे कर्मचारी क्वार्टरच्या खोलीत एकटेच राहत होते.  खोलीत आढळून आला. त्यांच्या शेजाऱ्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मीना यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शव विच्छेदनासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मीना यांच्या मृत्यूचे खरे कारण उघड होणार आहे. मात्र मीना यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत कोणी घातपात केला आहे का या अंगाने कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या घटनेमुळे रेल्वे वसाहत परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: suspicious death of railway diesel locomotive technician