केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 22:17 IST2021-10-25T22:17:17+5:302021-10-25T22:17:51+5:30

आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली.

Special cleaning week starts now in KDMC area | केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

कल्याण/डोंबिवली - महापालिका परिसर नागरिकांसाठी स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ऑक्टोबरमध्ये महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी राबविल्या जाणाऱ्या कायापालट अभियानांतर्गत 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ आज सकाळी 7 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत खडकपाडा सर्कल येथे झाला. 

आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली. यामध्ये पावसामुळे रस्त्यावर साचून राहिलेली माती आणि कचरा साफ करणे, रस्ता दुभाजक साफ करणे, त्यावरील गवत काढून टाकणे आदी कामे करण्यात आली. महापालिकेच्या इतर प्रभागातही संबंधित प्रभागाच्या सहा. आयुक्तांच्या उपस्थितीत आज सकाळी कायापालट अभियान राबविण्यात आले.यावेळी महापालिकेच्या कायापालट अभियानात एनजीओ, नागरिक यांनी सहभाग घेतल्यास शहर अधिक स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल, असे मत आयुक्त  सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

Web Title: Special cleaning week starts now in KDMC area