मुलाने केली वडिलांची हत्या, आजारपणाला कंटाळून डोक्यात घातलं 'जातं '
By प्रशांत माने | Updated: February 22, 2023 21:57 IST2023-02-22T21:56:24+5:302023-02-22T21:57:30+5:30
डोंबिवलीः वडिलांचे आजारपण आणि त्यांच्या सततच्या कटकटीला कंटाळून मुलाने त्यांच्या डोक्यात ' जातं ' घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याची ...

मुलाने केली वडिलांची हत्या, आजारपणाला कंटाळून डोक्यात घातलं 'जातं '
डोंबिवलीः वडिलांचे आजारपण आणि त्यांच्या सततच्या कटकटीला कंटाळून मुलाने त्यांच्या डोक्यात ' जातं ' घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. येथील पुूर्वेकडील खंबाळपाडा, भोईरवाडीत हा प्रकार घडला. मुलगा हत्या करुन स्वतःहून टिळकनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. तेजस शिंदे असे आरोपी मुलाचे नाव आहे.
तेजसचे वडील श्यामसुंदर (वय ६८) हे सतत आजारी असायचे. आजारपणामुळे ते सातत्याने बडबड करायचे. या त्रासाला कंटाळून वडिलांची हत्या केल्याची माहिती तेजसने पोलीसांना दिली. संध्याकाळी घरात कोणी नसताना त्याने शामसुंदर यांच्या डोक्यात जातं घातलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, तेजस स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली.