सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:47 IST2025-01-29T11:47:12+5:302025-01-29T11:47:29+5:30
घरी पूजा सुरू असताना परी घराबाहेर खेळायला गेली. परंतु, काही वेळातच चौथ्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.

सहा वर्षीय परीचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : नातेवाईकांकडे पूजेनिमित्त नालासोपारा येथून पालकांसोबत डोंबिवलीत आलेल्या सहा वर्षीय मुलीचा चौथ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दावडी परिसरात घडली. परी छोटूलाल बिंद असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दावडी येथील दर्शना पाम्स इमारतीत राहणाऱ्या मेहुण्याकडे पूजेनिमित्त नालासोपारा येथील छोटूलाल बिंद हे पत्नी आणि दोन मुलींसह
आले होते. घरी पूजा सुरू असताना परी घराबाहेर खेळायला गेली. परंतु, काही वेळातच चौथ्या मजल्यावरून तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.
... तर ती वाचली असती
इमारतीच्या तीन मजल्यावरील मोकळ्या पॅसेजमध्ये ग्रील लावलेले आहे. परंतु, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ग्रील लावण्यात आलेले नाही. त्या ठिकाणी ग्रील असते तर परी वाचली असती. संबंधित इमारतीच्या विकासकाला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी परीचे वडील छोटूलाल यांनी मानपाडा पोलिसांकडे केली आहे.
आवाज येताच पालकांसह तेथील रहिवाशांनी धाव घेतली. जखमी अवस्थेतील परीला नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.