थरकाप उडविणारी घटना! कल्याणमध्ये ब्रेकफेल खासगी बस सोसायटी आवारात कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 23:38 IST2023-04-27T23:37:38+5:302023-04-27T23:38:11+5:30
गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते.

थरकाप उडविणारी घटना! कल्याणमध्ये ब्रेकफेल खासगी बस सोसायटी आवारात कोसळली
कल्याणमध्ये गुरुवारी रात्री नागरिकांना थरकाप उडविणारी घटना घडली आहे. खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने बस संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात कोसळली. यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
या अपघातात कोणाला दुखापत झालेली नाहीय. बस कोसळल्याने सोसायटी मधील २-३ गाड्यांचे नुकसान झाले आहे. गोदरेज हिल परिसरात हा अपघात झाला. गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. ही बस गोदरेज हीलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षण भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली. सध्या घटनास्थळी खडकपाडा येथील पोलीस दाखल झाले आहेत. बस कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती.