कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:29 PM2021-06-03T18:29:54+5:302021-06-03T18:29:59+5:30

ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची मागणी

Shivniketan Trust takes initiative to accept custody of 25 children who lost their parents due to corona | कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार

कोरोनामुळे पालक गमाविलेल्या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टचा पुढाकार

Next

कल्याण- कोरोना काळात ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे. अशा २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्यास शिवनिकेतन ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. पालकत्व घेण्याचा प्रस्ताव ट्रस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे.

शिवनिकेतन ट्रस्टच्या वतीने भारतीय सैनिकी विद्यालय १९९५ सालापासून चालविले जात आहे. या शाळेत इयत्ता पाचवी ते १२ वी र्पयतचे वर्ग चालविले जातात. त्यामध्ये आजमितीस २५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी या शाळेतून १३५ मुलांनी पूर्ण शिक्षण घेतले आहे. शाळेची इमारत खडवली येथे आहे. त्याठिकाणी वस्तीगृह, स्वयंपाकगृह, प्रयोगशाळा,संगणक कक्ष, ग्रंथालय,  व्यायाम शाळा, फायरिंग रेंज, वैद्यकीय तपासणी या सुविधा त्याठिकाणी आहे. संस्थेचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की, कोरोना महामारीचे संकट आहे. समाजातील सर्व वर्गाला फटका बसला आहे.

कोरोनामुळे २९१५ मुलांनी त्यांच्या पालकांना गमाविले आहे. त्यापैकी ११४ बालकांचे आई वडील दोघांचा मृत्यू झाला आहे. या मुलांपुढे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. ११४ बालकांपैकी २५ बालकांचे पालकत्व स्विकारण्याची तयारी शिवनिकेनत संस्थेची आहे. या २५ मुलांचे इयत्ता सहावी ते १२ वीर्पयतचे शिक्षण, राहण्या खाण्याचा खर्च केला जाईल. सरकारकडून या २५ मुलांचे पालकत्व स्विकारण्याची परवानगी ट्रस्टच्या वतीने मागतली आहे. ट्रस्टला विश्वास आहे. सरकार त्यांना ही अनुमती देऊन समाज कार्याची संधी देईल याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Shivniketan Trust takes initiative to accept custody of 25 children who lost their parents due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.