शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:15 PM2021-02-24T12:15:54+5:302021-02-24T12:18:58+5:30

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली देणगी

Shiv Sena MP Dr Shrikant Shinde donates Rs 5 lakh for construction of Ram Mandir | शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी

googlenewsNext

डोंबिवली: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या मंदिर उभारणीत सक्रिय सहभागी होत पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. डोंबिवली येथील गणेश मंदिरचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर यांचेकडे पाच लाख रुपयांचा धनादेश डॉ. शिंदे यांनी सुपूर्द केला. फुल ना फुलाची पाकळी या स्वरुपात मलाही राममंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी दिली.
 
अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यानंतर आता राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियानाला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) १० अब्ज रुपये जमा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने केला आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर १००० वर्ष टिकावे, या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे. मंदिर उभारणीसाठी प्रदीर्घ लढा देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून प्रभू रामचंद्राला त्यांच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होता येणार असल्याची भावना देशभरातील भाविकांमध्ये आहे. सध्या देशभरात राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Shiv Sena MP Dr Shrikant Shinde donates Rs 5 lakh for construction of Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.