'मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा'; वडवली पुलाच्या उदघाटनावरून शिवसेनेचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:38 IST2021-03-23T13:38:08+5:302021-03-23T13:38:21+5:30
एकाअर्थाने मनसेने भाजपाला गुपचूप टाळी देत सेनेची राजकीय कोंडी केली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

'मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा'; वडवली पुलाच्या उदघाटनावरून शिवसेनेचा निशाणा
कल्याण: केडीएमसी प्रशासनाच्या अगोदरच वडवली पूलाचे उदघाटन मनसेकडून करण्यात आले. इतकेच नाही तर हा पूल नागरिकांसाठी खुला केल्याचेही मनसेने जाहीर केलं. त्यामुळे मनसेने सेनाला दे धक्का करत योग्य टायमिंग साधल्याची चर्चा होती. या सर्व प्रकारावर आता सेनेकडून प्रतिक्रिया उमटायला सुरवात झालीये. दुसऱ्यांच्या विकासकामांचे श्रेय मनसेला घेण्याची सवयच आहे. मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा अशी टीका कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
वडवली पूलाच्या उदघाटनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे मनसेने या पुलाचे उदघाटन केले. एकीकडे डोंबिवलीतील कोपर पुलाच्या गार्डर च्या कामाचा शुभारंभ करत शिवसेनेने पहिला नंबर लावला होता. तर कामाला खप उशीर झाल्याची खंत भाजापाने व्यक्त केली. भाजपा- शिवसेनेमधील कलगीतुरा ताजा असतानाच मनसेने वडवली पुलावरून सेनेला टार्गेट केलं. त्यामुळे एकाअर्थाने मनसेने भाजपाला गुपचूप टाळी देत सेनेची राजकीय कोंडी केली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.