शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 06:16 IST2023-06-10T06:15:52+5:302023-06-10T06:16:20+5:30

भाजप-शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत. 

shiv sena bjp dispute will be resolved soon says ramdas athawale | शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल: रामदास आठवले

शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल: रामदास आठवले

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल. ताे मिटविण्याचा आमचा प्रयत्न असून, भाजप-शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत. 

श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. आम्ही सगळे एकत्र बसून यासंदर्भातील निर्णय घेऊ, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते कल्याणमध्ये एका कार्यक्रमाला आले होते.

हा वाद म्हणजे अळवावरचे पाणी

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की, हा वाद अळवावरचे पाणी आहे. पाण्यावर काठी मारली तर पाणी तुटत नाही. त्यामुळे या वादाला महत्त्व देण्याची गरज नाही. शिंदे गटासोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी झाली आहे. आव्हाने मोठी आहेत. क्षुल्लक कारणावरून वाद होता कामा नये. हा वाद स्थानिक असून, त्यावर लवकर पडदा पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title: shiv sena bjp dispute will be resolved soon says ramdas athawale