कल्याण पश्चिमचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर आज एक शस्त्रक्रिया करण्यात आली. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार भोईर यांची भेट घेतली.शस्त्रक्रियेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भोईर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला होता. त्याचवेळी तुम्ही काही काळजी करु नका. तुमची सगळी काळजी मी घेणार, असे उपमुख्यमंत्र्यांनी भोईर यांना आश्वासीत केले होते. त्यांच्या शस्त्रक्रिया प्रक्रियेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे देखील लक्ष ठेवून हाेते.
शस्त्रक्रिये पश्चात उपमुख्यमंत्री यांनी आमदार भोईर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा आमदार भोईर यांनी बरे होताच जनता दरबार घेणार असल्याचे सांगितले.
Web Summary : Shinde Sena MLA Vishwanath Bhoir underwent successful surgery at Jupiter Hospital, Thane. Deputy Chief Minister Eknath Shinde visited him, assuring full support. Shinde had spoken to Bhoir before surgery. Bhoir plans a Janata Darbar soon.
Web Summary : शिंदे सेना के विधायक विश्वनाथ भोईर की ठाणे के जुपिटर अस्पताल में सफल सर्जरी हुई। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उनसे मुलाकात की और पूर्ण समर्थन का आश्वासन दिया। शिंदे ने सर्जरी से पहले भोईर से बात की थी। भोईर जल्द ही जनता दरबार लगाने की योजना बना रहे हैं।