उल्हासनगरात पाण्यासाठी वरिष्ठ नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन
By सदानंद नाईक | Updated: February 4, 2026 19:08 IST2026-02-04T19:08:40+5:302026-02-04T19:08:59+5:30
- सदानंद नाईक उल्हासनगर : सलग पाच दिवस पाणीपुरवठा ठप्प झाल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिक राजाराम पवार यांनी थेट अर्धनग्न व्यवस्थेत ...

उल्हासनगरात पाण्यासाठी वरिष्ठ नागरिकांचे अर्धनग्न आंदोलन
- सदानंद नाईक
उल्हासनगर : सलग पाच दिवस पाणीपुरवठा ठप्प झाल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ नागरिक राजाराम पवार यांनी थेट अर्धनग्न व्यवस्थेत दुचाकीवरून नेताजी गार्डन येथील पाणी कार्यालय गाठले. पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रारीकरूनही पाणी पुरवठा होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केल्यावर, अखेर विभागाने पाणी टँकर पाठविले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, प्रभाग क्रं-१४ मध्ये ६८ वर्षीय राजाराम पवार हे कुटुंबासह राहतात. त्यांच्यासह परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने, नागरिकांनी पाण्यासाठी एकच धावपळ उडाली. शुक्रवारी एमआयडीसीने दुरस्तीच्या नावाखाली २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवल्याने, गुरुवारी, शनिवारी कमी दाबाने तर शुक्रवारी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद होता. शहर पूर्वेत पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नागरिकांत असंतोष निर्माण झाला. जेष्ठ नागरिक राजाराम पवार यांच्याकडे सलग ५ दिवस पाणी पुरवठा झाला नसल्याने, ते पाणी पुरवठा कार्यालयात सलग तीन दिवस जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. मात्र प्रत्येक वेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पवार यांचे म्हणणे आहे.
अखेर पवार यांनी दुचाकीवरून जाऊन पाणी कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केल्यावर, पाणी पुरवठा प्रशासनाला जाग आली. त्यांनी संबंधित परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. तर मंगळवार पासुन पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. शहर पूर्वेला कमी दाबाने व अनियमित दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. दिवसाला कमीतकमी ऐक तास पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.