शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी महाविदयालयीन मुला मुलींना वयोवृद्ध महिला करायची अंमली पदार्थांची विक्री; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By प्रशांत माने | Updated: April 10, 2024 18:49 IST

दरम्यान तीला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना पाळत ठेवून तीला बेडया ठोकल्या. तीच्याकडून साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे.

डोंबिवली: शाळकरी, महाविदयालयीन मुला मुलींना अंमली पदार्थांची विक्री करणा-या वयोवृद्ध महिलेला टिळकनगर पोलिसांनी सापळा लावून अटक केली. एक वयोवृद्ध महिला ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान तीला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना पाळत ठेवून तीला बेडया ठोकल्या. तीच्याकडून साडेपाच लाखांचे ब्राऊन शुगर जप्त केले आहे.

सलमाबेगम नूर मोहम्मद शेख (वय ६२) रा. कचोरेगाव, हनुमान नगर, पत्रीपूल कल्याण पश्चिम, असे अटक आरोपी महिलेचे नाव आहे. याआधीही तीला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक होऊन तीची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. परंतू कारागृहाबाहेर येताच येताच तीने पुन्हा एकदा अंमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरू केला. ती शाळकरी आणि महाविदयालयीन मुला मुलींना पुन्हा एकदा अंमली पदार्थ विकते अशी माहिती टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार कदम यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीला पकडण्यासाठी विशेष पथक नेमले होते.

साध्या वेशात शाळेच्या छतावर महिनाभर ठेवली पाळत -सलमाबेगम ही शाळकरी आणि महाविदयालयीन मुला मुलींना ब्राऊन शुगर पुरवत असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तीला रंगेहाथ पकडण्यासाठी एका शाळेच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर महिनाभर पाळत ठेवली होती. तीला ताब्यात घेतल्यावर तीच्याकडे ३६ हजार ७९० रूपयांची रोकड आणि पाच लाख २० हजार रूपये किमतीचे १०४ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर असा एकुण पाच लाख ५६ हजार ७९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीSchoolशाळाDrugsअमली पदार्थ