शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

एमआयडीसीतील महावितरणचे रोहित्र बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 11:42 PM

लोखंडी जाळ्यांचे कुंपण तुटलेले : झाडेझुडपेही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसीमधील  निवासी भागातील  महावितरणचे बहुतांशी रोहित्र अतिधोकादायक बनली आहेत. ते रस्ते व इमारतींच्या कडेला असून, बहुतेक ठिकाणी त्यांचे संरक्षक कुंपण तुटल्याने एखादे वाहन त्यावर धडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच झाडेझुडपे व परिसरात पडलेला कचरा याला आग लागल्यास अपघातही घडू शकतो, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. 

महावितरणने एमआयडीसीतील रोहित्र व त्यांच्या तांत्रिक कारणांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे  गेल्या वर्षभरात अनेक वेळा रोहित्राला आग लागून स्फोट झाल्याचा घटना घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी पत्र देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सांगूनही देखभाल होत नसल्याची खंत तेथील रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली. नियमित साफसफाई, रोहित्रामधील ऑइल याची तपासणी योग्य वेळी झाली पाहिजे. रोहित्राला लागणारे किमती ऑइल रोहित्रामधून काढून चोरणारे समाजकंटक त्या ठिकाणी कुंपण नसल्याचा फायदा घेत असल्याचे ते म्हणाले. अशा अतिधोकादायक, देखभाल होत नसलेल्या रोहित्राची माहिती स्थानिक एमआयडीसी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही त्यांच्याकडून कार्यवाही होताना दिसत नाही. काही वेळेस हे सर्व आमचा सिव्हिल खात्याकडे किंवा वरिष्ठांना पत्र देऊन कळवितो, असे महावितरणचे अधिकारी तोंडी सांगतात. मात्र, खरेच असे पत्र दिले आहे का, हे मात्र समजू शकलेले नसल्याचे ते म्हणाले. 

वीजपुरवठा खंडित झाल्यास होते गैरसोयnसध्या उन्हाळा असल्याने वीज वितरणवर ताण येत आहे. आताही काही भागात तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वाढत उष्मा, वर्क फ्रॉम होम तसेच काही जण कोरोनामुळे घरातच विलगीकरणात आहे. त्यात वीज नसल्यास नागरिक मेटकुटीला येतात. nएमआयडीसीतील रोहित्राच्या स्थितीबद्दल वारंवार महावितरणचा वरिष्ठ अभियंत्यांना फोटोसह समाजमाध्यमांवर, मोबाइलवर कळवण्यात येत असूनही कार्यवाही का होत नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे नलावडे पुढे म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याण