रोहा-दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळेत बदल, ४:३० च्या ऐवजी आता 'इतक्या' वाजता निघणार!

By अनिकेत घमंडी | Updated: July 16, 2024 20:01 IST2024-07-16T20:00:10+5:302024-07-16T20:01:24+5:30

मध्य रेल्वेने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले जाहीर

Roha-Diwa Memu Train Service Timings Changed, Instead of 4:30, It Will Leave at 'So'! | रोहा-दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळेत बदल, ४:३० च्या ऐवजी आता 'इतक्या' वाजता निघणार!

रोहा-दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळेत बदल, ४:३० च्या ऐवजी आता 'इतक्या' वाजता निघणार!

अनिकेत घमंडी, डोंबिवली: ०१३४८ रोहा - दिवा मेमू ट्रेन सेवेच्या वेळा २० जुलैपासून सुधारित करण्यात आल्या आहेत. सुधारित वेळेत ही गाडी दिव्यात संध्याकाळी ३५ मिनिटे लवकर पोहोचेल. गाडी क्रमांक रोहा - दिवा मेमू रोहा येथून दररोज संध्याकाळी ४:३० ऐवजी दुपारी ०३:५५ वाजता सुटेल आणि खालील वेळापत्रकानुसार दिवा येथे संध्याकाळी ०७:२५ ऐवजी ऐवजी संध्याकाळी ०६: ५० वाजता पोहोचेल असे मध्य रेल्वेने मंगळवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले.

प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा जेणेकरून पावसाच्या दिवसात कोणाचीही गैरसोय होणार नाही, तसेच कोणालाही ताटकळत बसावे लागणार नाही असेही आवाहन करण्यात आले.

Web Title: Roha-Diwa Memu Train Service Timings Changed, Instead of 4:30, It Will Leave at 'So'!