शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रायडर्स’; बोर्डाच्या परीक्षेसाठी शहर वाहतूक शाखेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 07:26 IST

बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तर २१ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा आहे. सीबीएसई बोर्डाची १० वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे.

डोंबिवली :  बारावी व दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वतीने शाळा, महाविद्यालयांच्या हद्दीत रायडर्स म्हणजेच वाहतूक शाखेचे हवालदार तैनात केले आहेत. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटची कामे आणि कोंडीमुळे वाहतूक शाखेने बोर्डाच्या परीक्षांच्या कालावधीत उपक्रम हाती घेतला आहे.

बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली, तर २१ फेब्रुवारीला दहावीची परीक्षा आहे. सीबीएसई बोर्डाची १० वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. डोंबिवली शहरात बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रिट आणि बाजूकडील गटारबांधणीची कामे सुरू आहेत. या कामांनिमित्त काही रस्त्यांवर प्रवेशबंदी आहे, तर काही ठिकाणी वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे.  रस्त्यांच्या कामांचा फटका बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी श्रीराम पाटील यांच्या अध्यक्षतेत शाळा, महाविद्यालयांच्या हद्दीतील प्रमुख मार्गांसाठी रायडर्स नेमले आहेत. ते महत्त्वाच्या मार्गांवर दुचाकीवरून गस्त घालून वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून खबरदारी घेणार आहेत. या कामी चार रायडर्स नेमले आहेत.

शहरातील या भागात राहील रायडर्सची गस्त

पोलिस हवालदार सुधाकर कदम यांना पूर्वेकडील स. वा. जोशी हायस्कूल - वि. पी. रोड - नेहरू रोड- फडके रोड- स्व. इंदिरा गांधी चौक - भगतसिंग रोड - टिळकचौक येथील जबाबदारी आहे.

पोलिस हवालदार रवींद्र कर्पे यांच्याकडे टिळकचौक - मानपाडा चार रस्ता - आईस फॅक्टरी - दत्तनगर चौक - नांदीवली रोड मार्ग देण्यात आला आहे.

पोलिस हवालदार दिलीप परदेशी यांना पश्चिमेकडील महात्मा फुले चौक - दिनदयाळ चौक - कोपरब्रीज - कोल्हापुरे चौक - बावनचाळ - महालक्ष्मी कॉर्नर - महात्मा फुले चौक मच्छी मार्केट या मार्गावर तर पोलिस हवालदार गणेश बोडके यांचा रेतीबंदर चौक - मोठागाव - स्वामीनारायण सिटी - रेल्वे फाटक येथील मार्गावरील वाहतुकीवर वॉच असणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिस