कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

By मुरलीधर भवार | Published: January 26, 2024 03:02 PM2024-01-26T15:02:07+5:302024-01-26T15:02:27+5:30

यावेळी अग्निशमन व आणिबाणी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Republic Day celebrated with enthusiasm in Kalyan Dombivli Municipal Corporation | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

कल्याण : आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणडोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सकाळी ०७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या समयी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी ध्वजवंदन करुन तिरंग्याला सलामी दिली. या समारंभात महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे, इतर अधिकारी,  माजी पालिका सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
यासमयी अग्निशमन दल, सुरक्षा दल आणि  स्थानिक पोलीस दल यांनी संचलन करून मानवंदना दिली.

यावेळी अग्निशमन व आणिबाणी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या  १४ गुणवंत सफाई कर्मचा-यांना, उपस्थित अधिकारी व पालिका सदस्य यांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तु प्रदान करून सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते मुरबाड येथील नवचैतन्य लोकसंचालित साधना केंद्र यांच्या महिला बचत गटातील शेतकरी महिला सभासदांना  उंबर्डे येथील कंपोस्ट खत विनामूल्य वितरित करण्यात आले.* हे कंपोस्ट खत बचत गटांच्या महिला सदस्यांना दरमहा विनामूल्य स्वरूपात देण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली. याप्रसंगी परिमंडळ 2 चे  उपायुक्त अवधुत तावडे, माजी पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तद्नंतर आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Republic Day celebrated with enthusiasm in Kalyan Dombivli Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.