संविधान दिन व शहीद दिनानिमित्त कल्याणमध्ये रॅलीचे आयोजन

By सचिन सागरे | Updated: November 26, 2023 16:02 IST2023-11-26T15:59:59+5:302023-11-26T16:02:03+5:30

'लोकशाहीसोबत चला' या उद्देशाने रॅलीचे काढण्यात आली

Rally organized in Kalyan on the occasion of Constitution Day and Martyr's Day | संविधान दिन व शहीद दिनानिमित्त कल्याणमध्ये रॅलीचे आयोजन

संविधान दिन व शहीद दिनानिमित्त कल्याणमध्ये रॅलीचे आयोजन

सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: संविधानदिन आणि २६/११ दहशतवादी हल्ला दिनानिमित्त कल्याणमध्ये मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ७४ वा संविधान दिनाच्या निमित्ताने तसेच २६/११ च्या मुंबई येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजीअहरज चौक ते प्रेम ऑटोपर्यंत 'लोकशाहीसोबत चला' या उद्देशाने मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीचे आयोजन सेट हिराचंद मुथा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मुथा फाउंडेशन शेठ हिराचंद मुथा स्कूल कमलादेवी कॉलेज आणि कल्याण डिस्ट्रिक्ट बार अँड असोसिएशन यांनी केले होते. या रॅलीमध्ये माजी पोलीस महासंचालक आणि एटीएस चीफ के. पी. रघुवंशी, माजी उपकुलगुरू डॉक्टर नरेश चंद्रा, संचालक प्रकाश मुथा, दलित मित्र अण्णा रोकडे यांच्या सहित अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

Web Title: Rally organized in Kalyan on the occasion of Constitution Day and Martyr's Day