शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: सोनसाखळी चोरुन तिथेच चोरी करायला आला अन् फसला; अंबरनाथमध्ये पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:28 IST

Ambernath Chain Snatcher Viral Video: अंबरनाथ रेल्वे स्थानकावर चोरी करुन पळणाऱ्या चोरट्याला रेल्वे पोलिसांनी शिताफीने पकडलं.

Ambernath Station Crime: अंबरनाथरेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानीची चेन हिसकावून पळून गेलेला चोर दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आला. पण यावेळी जीआरपी आणि आरपीएफ पथकांनी त्याला एका चित्रपटासारख्या सीनप्रकारे  पकडले. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चोरट्याला रेल्वे पोलिसांनी चपळता दाखवत रेल्वे ट्रॅकवरच पकडलं.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी या चोराला फिल्मी स्टाईलने अटक केली. पळून जाताना चोरट्याने रेल्वे रुळांवर उडी मारली होती. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेसमोर उडी मारत त्याला जागीच ताब्यात घेतले आणि अटक केली.या चोराने आदल्या दिवशी चेन स्नॅचिंग करुन पळ काढला होता. मात्र दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा चोरी करण्यासाठी परतला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मुकेश कोळी नावाच्या चोराने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. विद्यार्थ्यीनीने ताबडतोब जीआरपीकडे तक्रार दाखल केली. ही संपूर्ण घटा स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. चोराने दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीचा प्रयत्न केला. पण यावेळी, पोलिसांना सतर्कता मिळाली आणि त्यांनी सापळा रचला. चोर पुन्हा साखळी हिसकावून घेण्याच्या तयारीत असताना, त्याला पोलिस जवळ असल्याचे लक्षात आले आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.

चोर रेल्वे रुळांकडे पळाला आणि अडखळून लोकल ट्रेनसमोर पडला. त्याच वेळी जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने त्याला घेरले आणि पकडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.

प्राथमिक तपासात मुकेश कोळी गरजेपोटी ही चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याची संपूर्ण हालचाल, साखळी हिसकावून पळून जाणे, हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरी आणि अटकेची संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय बनली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chain snatcher caught red-handed in Ambernath after repeat attempt.

Web Summary : Ambernath: A chain snatcher, who stole from a college student, was caught by police in a filmy style while attempting another theft at the same station. CCTV footage captured the dramatic arrest after he jumped onto the tracks.
टॅग्स :ambernathअंबरनाथcentral railwayमध्य रेल्वेCrime Newsगुन्हेगारीViral Videoव्हायरल व्हिडिओrailwayरेल्वे