शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

एक लाख ग्रंथसंपदा असलेले कल्याणचे सार्वजनिक वाचनालय

By मुरलीधर भवार | Updated: January 23, 2023 06:12 IST

कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाची १८५४ साली सदाशिव साठे यांनी स्थापना केली.

कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाची १८५४ साली सदाशिव साठे यांनी स्थापना केली. एक लाख ग्रंथसंपदा असलेले हे वाचनालय १६० वर्षांपासून ज्ञानाची भूक भागविण्याचे काम अविरत करत आहे. या वाचनालयाची शतकोत्तर हीरकमहोत्सवी वाटचाल सुरू आहे. 

साठे यांनी या वाचनालयाची सुरुवात त्यांच्या घरातून केली होती. तेव्हा त्याला ‘नेटिव्ह लायब्ररी’ म्हणून संबोधले जात होते. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून या लायब्ररीचे नाव ‘सार्वजनिक वाचनालय’ असे ठेवण्यात आले. सुरुवातीला ४० पुस्तकांपासून सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयाची ग्रंथसंपदा एक लाखांच्या घरात पोहोचली आहे. आजही वाचकांकडून महिन्याला अवघे ३५ रुपये इतके अल्प शुल्क आकारले जाते. ‘अ’ वर्ग तालुका दर्जा सरकारकडून या वाचनालयाला मिळाला आहे. अनेक पुरस्कारही या वाचनालयाला मिळाले आहेत. या वाचनालयाला कविवर्य कुसुमाग्रज, ज्येष्ठ साहित्यिका वीणा देव, शं. ना. नवरे आदी साहित्यिकांनी भेट दिली आहे.  वाचनालय पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आले आहे. वाचकांसाठी मोबाइल ॲप आहे. वाचनालयाची वेबसाइट आहे. आजमितीस तीन हजार ५०० सभासद आहेत. जे दररोज विविध पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेतात.  

अभ्यासाकरिता दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. वाचनालयातर्फे वाचकांसाठी पु. भा. भावे व्याख्यानमाला आयोजित केली जाते. वाचक प्रेरणा दिन, ग्रंथ दिन साजरा केला जातो. दि. बा. मोकाशी यांच्या नावाने ‘कथा पुरस्कार’ दिला जातो. 

तीन शाखा, अभ्यासिका कार्यरतवाचनालयाच्या तीन शाखा आहेत. त्यापैकी दोन मराठी आणि एक हिंदी, इंग्रजी पुस्तकांची आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका चालविली जाते. वाचनालयाच्या ग्रंथ प्रचार व प्रसार उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, राजन खान, श्रीपाल सबनीस, प्रवीण दवणे आदी साहित्यिकांना पाचारण करण्यात आले आहे. 

कार्यकारिणीअध्यक्ष : मिलिंद कुलकर्णीसरचिटणीस : भिकू बारस्करग्रंथपाल : गौरी देवळेसहग्रंथपाल : करुणा कल्याणकरपदाधिकारी : प्रशांत मुल्हेरकर, सुरेश पटवर्धन, आशा जोशी, माधव डोळे, दिलीप कर्डेकर, अरुण देशपांडे, सीमा गोखले, श्रीधर घारपुरे, नीलिमा नरेगलकर, जितेंद्र भामरे, अमिता कुकडे, सुहास चौधरी, परिघा विधाते, अरविंद शिंपी