पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 21:52 IST2024-05-04T21:34:49+5:302024-05-04T21:52:26+5:30

ही माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

Prime Minister Narendra Modi public meeting in Kalyan on May 15 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा

 मुरलीधर भवार, कल्याण-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरात १० मे ऐवजी १५ मे रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे. कल्याण आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी ही प्रचार सभा असेल अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे १० मे रोजी सभा होणार होती. मात्र, या सभेच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स कॉम्प्लेक्सशेजारील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सभा होईल.

Web Title: Prime Minister Narendra Modi public meeting in Kalyan on May 15