शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

'म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध घालणे हाच सर्वोत्तम उपाय' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:37 PM

तज्ज्ञांनी व्यक्त केले मत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस'चे रुग्ण आढळून आले आहेत. 

ठळक मुद्देकल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस'चे रुग्ण आढळून आले आहेत. 

कल्याण : म्युकरमायकोसीस या  बुरशीजन्य आजरामुळे  वैद्यकीय क्षेत्रासमोरही नवीन आव्हान उभे राहिले आहे. त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध घालणे हाच सर्वोत्तम उपाय असून त्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांच्या वेबिनारमध्ये करण्यात आले आहे. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 'म्युकरमायकोसिस'वरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. कोविड रुग्णांवर आवश्यकता नसल्यास पहिल्या आठवड्यात स्टेरॉइड्सचा वापर न करणे, आवश्यकता भासल्यास स्टेरॉइड्सचा योग्य आणि गरज पडेल तितक्याच प्रमाणात वापर करणे, रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवणे, म्युकरमायकोसिसच्या संशयित रुग्णांमध्ये योग्य चाचण्या आणि गरज भासल्यास आवश्यक शस्त्रक्रियात्मक मूल्यमापन करणे यासारखे महत्वपूर्ण मुद्दे यावेळी अधोरेखित करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. म्युकरमायकोसिस'वर उपचार करण्याचे वैद्यकीय क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून ते अत्यंत खर्चिक आहे. त्यावरील शस्त्रक्रिया उपचार पद्धतही अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची असल्याने सध्या तरी त्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेणे हाच एकमेव पर्याय सध्या समोर असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले. या वेबिनारमध्ये  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह ठाणे आणि मुंबईतील तब्बल ४०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणdoctorडॉक्टर