शहरं
Join us  
Trending Stories
1
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
2
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
3
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
4
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
5
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
6
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
7
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
8
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
9
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
10
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
11
रितेश देशमुखसोबतच्या वादामुळे सोडला 'राजा शिवाजी' सिनेमा? रवी जाधव म्हणाले- "या सिनेमाची कल्पना माझी होती, पण..."
12
गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट
13
सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम
14
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..." 
15
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
16
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
17
Travel : शाहरुख खानच्या गाण्यांमध्ये दिसणारे स्वित्झर्लंडमधील 'ते' ठिकाण नक्की कुठे आहे? कसे जाल?
18
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
19
Ruturaj Gaikwad Record: टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला
20
५ वर्षांचं प्रेम, लग्नानंतर बायकोला शिकवलं, पोलीस अधिकारी बनवलं; आता नवऱ्यावरच केला आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:20 IST

Ambernath Local Body Election 2025: अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आघाडी, शिंदेसेना एकाकी...

Ambernath Local Body Election 2025: अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ होते. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. महापालिका निवडणुकीच्या गदारोळात शिंदेसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.

"काही लोक सत्तेसाठी अशाप्रकारची आघाडी काही करत असतील, तर यात वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे. शिवसेना कायम विरोधात बसलेली आहे. शिवसेनेला विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडणार नाही. पण लोकांच्या भावना काय आहेत, लोक काय म्हणून या गोष्टीकडे पाहतात, ते महत्त्वाचे आहे. आज ज्या प्रवृत्तीच्या विरोधात शिंदे यांनी उठाव केला, त्याच प्रवृत्तीबरोबर पुन्हा एकत्र जाण्याचे काम काही लोक स्वार्थासाठी करताना दिसत आहेत. मला असे वाटते की याबाबत आता वरिष्ठांनी योग्यप्रकारे निर्णय करणे आवश्यक आहे. सत्ता हेच सर्वस्व नाही, हे वरिष्ठांनी त्यांना लक्षात आणून दिले पाहिजे," अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक भाजपा नेतृत्वावर टीका केली.

अंबरनाथमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो असून या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शहरासाठी आम्ही वचनबद्ध असल्यामुळेच आम्ही अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे, असे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील म्हणाले. तर शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. द्वेषाचे राजकारण सोडून शहर विकासाचे राजकारण करू, असे काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी सांगितले.

दुसरीकडे, शिंदेसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर युती होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने काँग्रेससोबत अभद्र युती केली, असे शिंदेसेनेचे डॉ. बालाजी किणीकर म्हणाले होते

English
हिंदी सारांश
Web Title : Power isn't everything: Shrikant Shinde slams BJP-Congress alliance.

Web Summary : Shrikant Shinde criticized BJP's alliance with Congress in Ambernath, calling it self-serving. BJP formed the 'Ambernath Vikas Aghadi' with Congress and NCP (Ajit Pawar) to keep Shinde's Sena out of power after winning the municipal president post. BJP claims this is to combat corruption.
टॅग्स :ambernathअंबरनाथLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५nagaradhyakshaनगराध्यक्षShrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस