महिलेला लुटणारा रिक्षा चालकास पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक

By मुरलीधर भवार | Published: March 26, 2024 07:38 PM2024-03-26T19:38:38+5:302024-03-26T19:38:46+5:30

दोन अल्पवयीन मुलांनाही घेतले ताब्यात, १ लाख २० हजार रुपयांचे दागिने केले हस्तगत

police arrested rickshaw driver who robbed the woman in just six hours | महिलेला लुटणारा रिक्षा चालकास पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक

महिलेला लुटणारा रिक्षा चालकास पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक

डोंबिवली-फुले आणण्यासाठी निघालेल्या हार विक्रेत्या महिला प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखविला. अल्पवयीन मुलांच्या मदतीने महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तक्रार दाखल होताच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात महिलेला लुटणारा रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला अटक केली आहे. या गुन्हयात त्याच्यासोबत असलेले दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणारी तक्रादार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते. २२ मार्च रोजी ही महिला डोंबिवली घारडा सर्कल येथून कल्याण एपीएमसी मार्केटच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. महिला घरडा सर्कल येथे एका रिक्षात बसली. या रिक्षात रिक्षा चालकासह आणखी तिघेजण बसले होते. या रिक्षा चालकाने न्यू गोविंदवाडी बीएसयूपी इमारती जवळ निर्जनस्थळी रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याचवेळी मागे बसलेल्या दोन अल्पवयीन मुलानी फिर्यादी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. या प्रकरणी महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला . गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणला. डोंबिवली राम नगर पोलिसांच्या पथकाला यमहिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला डोंबिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. रिक्षा चालकाने त्यांचे नाव रिक्षावर लिहिले होते. त्यामुळे गुन्ह्यातील रिक्षाचा शोध घेणे पोलिसाना शक्य झाले. महिलेचे लुटलेले १ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालक खिल्लारे याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

Web Title: police arrested rickshaw driver who robbed the woman in just six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.