जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त बारावे घनकचरा प्रकल्पात मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण

By मुरलीधर भवार | Published: February 2, 2024 04:28 PM2024-02-02T16:28:36+5:302024-02-02T16:29:20+5:30

डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांच्या हस्ते बारावे घनकचरा प्रकल्प परिसरात मियावाकी पध्दतीने वृक्षरोपणास करण्यात आले.

Plantation of trees by miyawaki method in barve solid waste project on the occasion of world wetland day | जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त बारावे घनकचरा प्रकल्पात मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण

जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त बारावे घनकचरा प्रकल्पात मियावाकी पध्दतीने वृक्षारोपण

मुरलीधर भवार, कल्याण :  जागतिक पाणथळ भूमी दिनाचे औचित्य साधू कल्याणडोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड़ यांच्या हस्ते बारावे घनकचरा प्रकल्प परिसरात मियावाकी पध्दतीने वृक्षरोपणास करण्यात आले.

या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त प्रसाद बोरकर, धैर्यशील जाधव, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅन्ड ॲम्बेसेडर रुपींदर कौर आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक पाणथळ भूमी दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश वृक्ष लागवडीच्या माध्यमातुन आपण देत आहोत. यापुढे प्रत्येक प्रभागात हरित पट्टा तयार करण्याचा मानस आयुक्त जाखड यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिका व कॅच फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जात असलेल्या या प्रकल्पामध्ये सुमारे दीड एकर जागेवर मियावाकी पध्दतीने एकूण पाच हजार झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये बकुळ, निम, अर्जुन, कदंब, जांभुळ, पिंपळ या देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे. कॅव्हेस्ट्रो इंडिया प्रा.लि. यांच्या सीएसआर फंडामधून कॅच फाऊंडेशन यांचेमार्फत या वृक्षांची पुढील ३ वर्ष देखभाल केली जाणार आहे.

Web Title: Plantation of trees by miyawaki method in barve solid waste project on the occasion of world wetland day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.