शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 08:25 IST

Kalyan Railway Station News: कल्याण स्टेशनवर लोकल अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाचा रुग्णालयातून घरी पाठवताच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण: लोकलमधून उतरताना कल्याण रेल्वेस्थानकात पडून डेव्हिड घाडगे हे जखमी झाले. उपचारासाठी  त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टरांनी उपचार करून घरी पाठवले. मात्र, काही तासांनंतर घरीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला आणि जोपर्यंत डॉक्टरावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. डॉक्टरांनी ॲडमिट करून का घेतले नाही ? डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे हा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. कल्याणनजीक आंबिवली परिसरात राहणारे डेव्हिड घाडगे मुंबईतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिपाई आहेत.

डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

शनिवारी घरी असताना डेव्हिड यांना एक्स-रेसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. मात्र, घरीच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणून ठेवला आहे. घाडगे यांचा मुलगा तुषार आणि त्यांचे नातेवाईक गौतम मोरे यांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे डेव्हिड यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन करू देणार नाही,  मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसही रुग्णालयात आले.  पोलिसांकडून घाडगे कुटुंबाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी काय म्हणाल्या?

नेमकं काय प्रकार घडला आहे, याची माहिती घेऊन शहानिशा केली जाईल. त्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल, असे केडीएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी म्हटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan: Injured in Train Fall, Sent Home, Died Hours Later!

Web Summary : David Ghadge died hours after being discharged from Kalyan hospital following a train accident. Family alleges medical negligence, refusing to claim the body until action is taken against the doctor. Police are investigating.
टॅग्स :kalyanकल्याणDeathमृत्यूAccidentअपघात