शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभे करू; कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा इशारा

By प्रशांत माने | Updated: November 5, 2023 14:14 IST

रिक्षा चालकांच्या प्रलंबितप्रश्नांकडे दुर्लक्ष, होतेय चालढकल

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: रिक्षाचालकांचे प्रश्न त्यांना भेडसावणा-या समस्या शासन दरबारी अनेक वर्षे प्रलंबित असून याबाबत परिवहन आधिकारी, रिक्षा टॅक्सी संघटनाचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक घेऊन तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव प्रकाश पेणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडविण्याबाबत दुर्लक्ष करून चालढकलपणा सुरू आहे. याप्रकरणी रिक्षाचालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे जर योग्य न्याय नाही मिळाला तर एसटी महामंडळ कामगारांप्रमाणे रिक्षा चालकांचेही महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभे राहील असा इशारा देखील पेणकर यांनी दिला आहे.

खुले रिक्षा टॅक्सी परवान्यांमुळे रिक्षा टॅक्सींची संख्या प्रचंड वाढली आहे. यात स्पर्धा निर्माण होऊन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. उपासमारीची वेळ आल्याने खुले परवाने तात्काळ बंद करून दहा पंधरा वर्षे परवाना वाटपाला स्थगिती देणे. रिक्षा चालकांना आरोग्य मुलाबाळांना शैक्षणिक लाभ, घरकुल ,पेन्शन योजना लाभ प्राप्ती करीता माथाडी कामगारांप्रमाणे कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. पारदर्शकता आणि कामकाजात प्रत्यक्ष सहभाग म्हणून महामंडळावर कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा प्रतिनिधी नेमावा. वाहतुक पोलिसांकडुन रिक्षा टॅक्सी चालकांवर सरकारी डिव्हाइस विना मोबाईल शुट सुरू असलेला कारवाईचा अतिरेक थांबवावा. हजारो रिक्षाचालकांचे मोठया प्रमाणात ई-चलन दंड थकीत आहे. ते भरण्यास रिक्षा चालक असमर्थ आहे.

रिक्षा व्यवसाय उदरनिर्वाहाचे साधन आहे दडं भरण्याचे माध्यम नव्हे सरकारने ई-चलन तडजोड शुल्क दंडात भरमसाठ वाढ केली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांचे उत्पन्न कमाई व दंड रक्कम याची सांगड बसत नाही. थकित दंड अभय योजना अमलात आणुन लोकन्यायालय भरवुन सवलत व तडजोड करुन कमीत कमी दंड आकारुन थकित दंड प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत तसेच ई-रिक्षानां परवाना सक्ती नाही हे प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक व गंभीर आहे. इतरांप्रमाणे ई- रिक्षानां देखील परवाना बंधनकारक करावा आदि मागण्या महासंघाने केल्या आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा