कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 22:48 IST2022-01-08T22:47:54+5:302022-01-08T22:48:05+5:30

कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीती वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जी ठिकामी कोरोना स्प्रेडर आहेत. त्यापैकी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करावा असे आदेश महापालिका

Order to close the retail market in the Agricultural Produce Market Committee against the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश

कल्याण-

कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीती वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जी ठिकामी कोरोना स्प्रेडर आहेत. त्यापैकी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करावा असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

किरकोळ बाजार बंद करीत असताना घाऊक व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आवश्यक आहे. त्यांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जावा. तसेच लसीचे दोन डोस घेण्याची सक्ती केली जावी. अन्यथा त्यांना बाजार समितीत प्रवेश दिला जाऊ नये. बाजार समितीत राज्यातील विविध जिल्हे आणि राज्याबाहेर शेतमाल घेऊन येणारी वाहने शेकडोच्या संख्येत असतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणो ही बाजार समिती प्रशासनाची जबाबदारी आहे. तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुस:या लाटेत केवळ शेतमाल वाहणाऱ्या 5क् वाहनांचा बाजार समितीत प्रवेश दिला जात होता.

बाजार समिती प्रमाणोच कल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी भाजीपाला मार्केट आहे. या मार्केटमध्ये ओटय़ावर व्यापार करणारे व्यापारी आहे. त्यांनी एक दिवसा आड ओटय़ावर व्यापार करावा अशा सूचना व्यापारी वर्गाला देण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व ठिकाणीचे आठवडी बाजार रद्द करण्यात आलेले आहेत. आठवडी बाजार भरविल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. सुपर स्प्रेडरमध्ये मॉल आणि मार्केटमधील व्यापा:यांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणो गरजेचे असल्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

Web Title: Order to close the retail market in the Agricultural Produce Market Committee against the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.