काटई ऐरोली बोगद्यातील मार्गाची एक लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 07:51 PM2023-12-05T19:51:16+5:302023-12-05T19:52:11+5:30

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली विविध विकास प्रकल्पांची पाहणी

One lane of route in Katai Airoli tunnel will be opened in the first week of February | काटई ऐरोली बोगद्यातील मार्गाची एक लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार

काटई ऐरोली बोगद्यातील मार्गाची एक लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार

कल्याण : काटई ऐरोली बोगद्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या बोगद्यातून जाणाऱ्या मार्गाची एक लेन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुली करण्यात येणार आहे. बेलापूर ते वाय जंक्शन हे अंतर कापण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधील लागत होता. या बोगद्यातून जाणाऱ्या काटई ऐरोली मार्गाच्या सगळयाच लेन सुरु झाल्यावर अंतर आणि वेळ कमी होणार आहे. तसेच इंधनाची बचत होऊन वाहतूक कोंडी सूटण्यास मदत होणार आहे. वाहतूक कल्याण आणि शीळ फाट्याच्या दिशेने निघून जाईल अशी माहिती खासदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या बोगद्यातील कामाची पाहणीही खासदार शिंदे यांनी केली.

शीळ फाटा सर्कलवरही उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. हे काम मार्गी लावण्याकरीता एमआयडीसीच्या रस्त्याच्या एक दोन लेन वाढवून जंक्शनवरील उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्याकरीता वाहतूक बंद न ठेवता काम करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक विभागाच्या पोलिस अधिकारी वर्गास पाहणी दरम्यान खासदार शिंदे यांनी दिल्या आहेत. शीळ फाटा उड्डाणपूलाची एक लेन १५ जानेवारीपर्यंत खुली करण्याचे खासदार शिंदे यांनी सूचित केले आहे. ही एक लेन खुली झाल्यावर हलकी वाहने खालून जातील. तर अवजड वाहने पूलावरुन मार्गस्थ होतील. या ठिकाणचीही पाहणी खासदार शिंदे यांनी केली.

 कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम केवळ पाच किलोमीटरच्या अंतरा पूर्णत्वास येणे बाकी आहे. या पाच किलोमीटरच्या अंतरात काही ठिकाणी दोन तर काही ठीकाणी तीन लेन पूर्णत्वसास आल्या आहेत. ज्या ठिकाणी सहा लेन झाल्या नाहीत. त्याठिकाणच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रश्न होता. या मोबदला किती द्यायचा या प्रश्न येत्या आठवड्यात मार्गी लागणार आहे. त्यानंतर पाच किलोमीटरच्या अंतरातील कामाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर याच रस्त्यावर राजणाेली ते शीळ पर्यंत एलिव्हेटेड रस्ता तयार केला जाणार आहे. त्याकरीता 5000 कोटीचा डीपीआर राज्य सरकारकडे मंजूरीकरीता पाठविला आहे. सहा पदरी कल्याण शीळ रस्ता आणि राजणाेली ते शीळ एलिव्हेटेड रस्ता झाल्यावर कल्याण आणि भिंवडीच्या दिशेची वाहतूकीचा ताण कमी होण्यास महता होणार आहे.

खासदार डॉक्टर  श्रीकांत शिंदे यांची विविध विकास कामांची पाहणी दौरा 

कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विविध विकास कामांची पाहणी केली आहे. यामध्ये , रांजोली येथील रस्त्याची पाहणी, पलावा जंक्शन येथील पुलाचे काम ,शीलफाटा येथील रस्त्याचे काम, शिलफाटा येथील पुलाचे काम , पलावा पुलाचे पाहणी दरम्यान डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले आहे. आम्ही टाईमपास करायला आलो नाही फेब्रुवारी पर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे

Web Title: One lane of route in Katai Airoli tunnel will be opened in the first week of February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.