केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू; काळजी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:52 IST2025-05-27T06:50:38+5:302025-05-27T06:52:35+5:30

नागरिकांनी आरोग्याविषयी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे

One dies of corona in KDMC three are undergoing treatment | केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू; काळजी घेण्याचे आवाहन

केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू; काळजी घेण्याचे आवाहन

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या तीन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे. नागरिकांनी आरोग्याविषयी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांत कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. यापूर्वी मार्च २०२० मध्ये कल्याण, डोंबिवली ही दोन्ही शहरे कोरोनाचा हॉट स्पॉट ठरली होती. या शहरांत पहिली, दुसरी आणि तिसरी कोरोनाची लाट आली होती. तिसऱ्या लाटेनंतर येथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. आता कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू शकते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याविषयी काळजी घ्यावी. 

आजपासून चाचण्या सुरू 

पालिकेने कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आता विलगीकरण कक्ष सुरू केला असून, मंगळवारपासून आरटी-पीसीआर टेस्टलाही सुुरुवात केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त बोरकर यांनी दिली.

कोणालाही श्वास घेण्यास त्रास झाल्यास, तसेच सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा धरणे आदी लक्षणे जाणवल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे. लक्षणे सौम्य स्वरुपात असली तरी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल  डिस्टन्स पाळावे, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा, असे आवाहन बोरकर यांनी केले आहे.
 

Web Title: One dies of corona in KDMC three are undergoing treatment