लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ: मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झाली आहे. कित्येक वर्षे रखडून राहिलेल्या या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आले आहे. भाजप आ. किसन कथोरे आणि आ. सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ झाला. या ट्रेनमुळे सात मिनिटांत भाविकांना मलंगगड गाठता येणार असल्याने दाेन तासांची पायपीट थांबणार आहे.
कल्याणजवळील मलंगगड हे ठाणे जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम भाविकांचे प्रसिद्ध धार्मिकस्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी भाविकांना दोन तासांची पायपीट करावी लागते. त्यामुळे अनेक भाविकांना इच्छा असतानाही त्याठिकाणी जाता येत नव्हते. कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर याठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगड आणि मलंगगडासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामही सुरू झाले होते.
ट्रेनला जाेडले दोन प्रशस्त डबे
मलंगगड ट्रेन मार्गिकेवर दोन ट्रेन धावणार आहेत. एका ट्रेनला दोन प्रशस्त डबे आहेत. त्यातून दर तासाला सुमारे एक हजार २०० प्रवासी प्रवास करू शकतील. भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा २४ x ७ तास देण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली. या फ्युनिक्युलर ट्रेनसाठी ७० कर्मचारी तैनात केले आहेत.
Web Summary : The much-awaited funicular railway to Malanggad is finally operational, cutting travel time to seven minutes. Previously, pilgrims faced a two-hour trek. The railway, a project long in the making, features two trains with spacious compartments, accommodating 1200 passengers hourly and employing 70 staff.
Web Summary : मलंगढ़ के लिए बहुप्रतीक्षित फ्यूनिक्युलर रेलवे आखिरकार शुरू हो गई है, जिससे यात्रा का समय सात मिनट हो गया है। पहले तीर्थयात्रियों को दो घंटे की पैदल यात्रा करनी पड़ती थी। इस रेलवे में दो ट्रेनें हैं जिनमें विशाल डिब्बे हैं, जो प्रति घंटे 1200 यात्रियों को समायोजित कर सकते हैं और 70 कर्मचारी कार्यरत हैं।