शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भाजपसह शिवसेनेला राष्ट्रवादीचा ‘दे धक्का’; जितेंद्र आव्हाड यांनी दिला पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:19 IST

मुंबईतील पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने विरोधी पक्ष भाजपसह महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दे धक्का दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच माजी नगरसेवकांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने विरोधी पक्ष भाजपसह महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला दे धक्का दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांमध्ये सुनीता खंडागळे (भाजप), उर्मिला गोसावी (शिवसेना), कुणाल पाटील (भाजप समर्थक अपक्ष), तांजिला मौलवी  (एमआयएम), फैजल जलाल (अपक्ष) यांचा समावेश आहे. मात्र, यादीत समावेश असलेले रामभाऊ ओव्हाळ (बसपा) हे माजी नगरसेवक मात्र पक्ष प्रवेशावेळी उपस्थित नव्हते.

पाच माजी नगरसेवकांसह मनसेचे कल्याण पूर्वेतील युवा संघटक संदीप टावरे, माजी शाखा अध्यक्ष रियाज शेख,  युवासेना कल्याण पूर्व संघटक जिवा भोसले, युवा सेना अधिकारी मनोज गायकवाड, समाजवादी पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष शिवसागर यादव, एमआयएमचे ठाणे जिल्हाध्यक्ष आयाज मौलवी आदींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, डॉ. वंडार पाटील, प्रमोद हिंदूराव, शरद महाजन, रमेश हनुमंतेंसह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना