"मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो" एकनाथ शिंदेंनी केलं खासदारांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:17 IST2022-02-18T13:17:15+5:302022-02-18T13:17:50+5:30

शिवसेनेने आधी भाजपला चुचकारलेे, नंतर नाकारले, कपिल पाटील यांच्या केंद्र सरकारला श्रेय देण्याच्या मागणीला दिली अशीही बगल

MP Shrikant Shinde criticized MNS MLA Raju Patil, Eknath Shinde praised Shrikant Shinde | "मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो" एकनाथ शिंदेंनी केलं खासदारांचे कौतुक

"मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतो" एकनाथ शिंदेंनी केलं खासदारांचे कौतुक

कल्याण :  कल्याण-डोंबिवलीतील कामे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असल्याने केंद्र सरकारचा नामोल्लेख करून त्यांना श्रेय द्या, अशी आग्रही मागणी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. त्यावर केंद्र व राज्य सरकारमध्ये भेदभाव नाही. आपण सगळे एकच आहोत, असे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्या मागणीला बगल दिली. मात्र राज्यात शिवसेना व भाजपमध्ये गेले तीन दिवस विसंवादी सूर वाढला असताना ‘आपण सगळे एकच आहोत’ या शिंदे यांच्या टिप्पणीची चर्चा सुरू झाली.

महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावकर सभागृहाचे नूतनीकरण केले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी त्याचे उदघाटन झाले. स्मार्ट सिटी प्रकल्पातून खाडी किनारा विकास आणि नौदल संग्रहालय उभारले जात आहे. त्याला केंद्राचा निधी प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेण्याचा आग्रह पालकमंत्र्यांकडे धरला. शिंदे यांनी  सावरकरांचे नाव घेतले. त्यानंतर स्मार्ट सिटीतून विकास कामे केली जात असून निधी केंद्र सरकारने दिला असल्याने केंद्र सरकारचे नाव घ्या, असा आग्रह पाटील यांनी धरल्यावर शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकार असा भेदभाव नाही. आपण एकच आहोत, असे उत्तर पाटील यांना दिले. प्रेक्षकांमध्ये उभे असलेले भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना व्यासपीठावर शिंदे यांनी बोलावले. मात्र चव्हाण व्यासपीठावर गेले नाहीत. 

श्रीकांत शिंदे यांचा राजू पाटील यांना टोला

एमआयडीसीतील रस्त्यांच्या कामाच्या श्रेयावरून यापूर्वी शिवसेना व मनसेत बॅनरबाजी झाली होती. गुरुवारी येथील रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसे आ. राजू पाटील यांना टोला लगावला. खा. शिंदे आ. पाटील यांना उद्देशून म्हणाले की, काम पत्र देऊन नव्हे तर प्रत्यक्ष पाठपुरावा करून करवून घ्यावी लागतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत यांचे कौतुक केले. मी फावडा कुदळ नेतो तर श्रीकांत जेसीबी नेऊन वेगाने काम करतात, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.  

कामाचे भूमिपूजन झाले असले तरी आगामी काळात निधी दिल्लीवरून येईल. शहर वाढत असताना सीबीएससी शाळा येथे सुरू होणे गरजेचे आहे. डोंबिवलीत झपाट्याने बदल होतील कारण मुंबई माझी आई तर डोंबिवली माझी मावशी आहे. या शहरावर माझे प्रेम आहे.
- आदित्य ठाकरे, पर्यावरण, पर्यटन मंत्री

Web Title: MP Shrikant Shinde criticized MNS MLA Raju Patil, Eknath Shinde praised Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.