कधीतरी तयार झालेला रस्ता सुध्दा दाखवा!,  मनसेचं हटके 'पोस्टकार्ड' ठरतंय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 04:45 PM2022-01-30T16:45:54+5:302022-01-30T16:49:11+5:30

एमआयडीसी निवासी भागातील नादुरूस्त रस्त्यांच्या कामांसाठी वेळोवेळी मंजूर झालेल्या निधीबाबत शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतू रस्ते काही झाले नाहीत. या बॅनरबाजीवर टिका करणारा एक पोस्ट कार्ड मजकूर असलेला बॅनर मनसेच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने निवासी भागात लावण्यात आला आहे.

mns postcard banner against Shiv Sena about road work in midc dombivli | कधीतरी तयार झालेला रस्ता सुध्दा दाखवा!,  मनसेचं हटके 'पोस्टकार्ड' ठरतंय चर्चेचा विषय

कधीतरी तयार झालेला रस्ता सुध्दा दाखवा!,  मनसेचं हटके 'पोस्टकार्ड' ठरतंय चर्चेचा विषय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली:  येथील एमआयडीसी निवासी भागातील नादुरूस्त रस्त्यांच्या कामांसाठी वेळोवेळी मंजूर झालेल्या निधीबाबत शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतू रस्ते काही झाले नाहीत. या बॅनरबाजीवर टिका करणारा एक पोस्ट कार्ड मजकूर असलेला बॅनर मनसेच्याडोंबिवली शहर शाखेच्या वतीने निवासी भागात लावण्यात आला आहे. सालाबादप्रमाणो निधी मंजूर झाल्याचे बॅनर होर्डीग्ज दाखविले, कधीतरी तयार झालेला रस्ता सुध्दा दाखवा अशा शब्दात शिवसेनेच्या श्रेयवादावर टिका केली आहे.

2015 च्या केडीएमसी निवडणुकीआधी 27 गावांसह एमआयडीसी निवासी भागाचा मनपा क्षेत्रत समावेश झाला. येथील रस्ते खड्डेमय स्थितीत आहेत. तात्पुरती डांबराची डागडुजी केली जात असल्याने पावसाळयात खड्डे आणि इतर वेळी धुळीचा त्रस येथील रहिवाशांना सोसावा लागतो. रस्त्यांची जबाबदारी कोणाची यावरून केडीएमसी आणि एमआयडीसीत वाद देखील उफाळून आला होता. परंतू पुढे निधीची कमतरता असल्याचे सांगत रस्ते जैसे थे खड्डेमय राहीले. परंतू निवडणुकांच्या तोंडावर याठिकाणी शिवसेनेकडून वेळोवेळी रस्ते विकासासाठी निधी मंजूर झाल्याचे बॅनर लागले पण आजही रस्ते दयनीय अवस्थेत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

गेल्यावर्षी श्रेय घेण्यासाठी तिस-यांदा लावलेले बॅनर फाटले पण रस्ते अजूनही तसेच आहेत काम लवकर चालू करा तुमच्या अभिनंदनाचे बॅनर आम्ही लावू असे व्टिट करून मनसेचे आमदार प्रमोद (राजू)पाटील यांनी नुकतेच डिवचले होते आता पोस्टरकार्ड बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेवर टिकास्त्र सोडण्यात आले आहे. श्री श्रेयस निधी मंजूरकर हयांस कोपरापासून हात जोडून नमस्कार, सालाबाद प्रमाणो एमआयडीसीत रस्त्यासाठी मंजूर झाल्याचे बॅनर लावण्यात आहे आहेत. कधी तरी झालेला रस्ता सुद्धा दाखवा. आपले कृपाभिलाषी त्रसलेले डोंबिवलीकर. होर्डिग आणि बॅनरबाज मंडळी डोंबिवली परिसर पिनकोडचा उल्लेख त्यात केलेला आहे. या पोस्टकार्डवर जो ठप्पा मारला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा वाघ दाखिवण्यात आला आहे. या टिकेला आता शिवसेना काय उत्तर देते याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: mns postcard banner against Shiv Sena about road work in midc dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.