डोंबिवली: मनसे नेते राजू पाटील यांनी सहकुटुंब काटई मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मनसेचे उमेदवार योगेश पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवसेना भाजप युतीवर टीका केली.मनसे नेते राजू पाटील म्हणाले, जो आपल्या भागात अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी सर्व भूमिपुत्रांनी मतदानासाठी उतरले पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही. हा केवळ युतीचा पॅटर्न आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे. युतीमध्ये काही अलबेल नाही. सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचे नाव या लोकांनी खराब करून टाकले. इथल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे.
शाई लगेचच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप -दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॅनल क्रमांक ९ मधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई चक्क लगेचच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे. या प्रकारामुळे पारदर्शक मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
उर्मिला तांबे या प्रकाराबाबत माहिती मिळताच उर्मिला तांबे यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. "मतदानासाठी बोटाला लावलेली शाई जर लगेच पुसली जात असेल, तर हा काय प्रकार आहे? जर असेच गैरप्रकार करायचे असतील तर निवडणुका घेता कशाला?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या शाईचा वापर करून बोगस मतदान होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
Web Summary : Raju Patil criticized the Shiv Sena-BJP alliance, calling it a pattern, not friendly. MNS candidate Urmila Tambe alleged indelible ink was easily erasable, raising concerns about fair elections in Kalyan-Dombivli.
Web Summary : राजू पाटिल ने शिवसेना-भाजपा गठबंधन को एक पैटर्न बताया, दोस्ताना नहीं। मनसे उम्मीदवार उर्मिला तांबे ने आरोप लगाया कि अमिट स्याही आसानी से मिट रही है, जिससे कल्याण-डोंबिवली में निष्पक्ष चुनाव पर चिंता जताई गई।