शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 23:15 IST2022-07-21T23:07:24+5:302022-07-21T23:15:21+5:30

आमदार भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही दांडगे यांची भेट घेतली. यावेळी भोईर यांच्याकडून त्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

MLA Vishwanath Bhoir meet Bhausaheb Dangade commissioner of KDMC | शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला! 

शिंदे गटातील आमदाराने घेतली आयुक्तांची फिरकी अन् एकच हशा पिकला! 

- मयुरी चव्हाण 

कल्याण : शिंदे गटातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ दांगडे यांनी पदभार स्वीकारताच शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांची वैयक्तिक भेट घेत आहेत. 

आमदार भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही  दांडगे यांची भेट घेतली. यावेळी भोईर यांच्याकडून त्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हसतखेळत गप्पा सुरु होत्या. तितक्यात भोईर यांनी आयुक्तांची फिरकी घेतली. भोईर यांनी आयुक्तांकडे इशारा केला आणि  हळूच म्हणाले, हे आपल्या  गटातील आहे. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला. यावेळी आयुक्तांनाही हसू आवरलं नाही. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं, तेव्हा विश्वनाथ भोईर हे अगदी अयोध्या दौऱ्यापासून शिंदे यांच्यासोबत होते. त्यामुळे सर्वत्रच गटातटाच्या राजकारणाला वेग आला आहे. राजकीय दहिकाल्यामुळे  कोण कोणत्या गटात आहे, हे समजत नसलं तरी शिंदे गटात इन्कमिंग जोरात सुरू आहे. कोणतेही आयुक्त रुजू झाले की, त्यांच्यावरून राजकीय पक्षात नेहमीच जुंपली आहे. दुजाभाव केल्याचा आरोपही याअगोदरच्या अनेक आयुक्तांवर झाला. मात्र आता खुद्द शिंदे गटातील आमदाराने खेळीमेळीच्या वातावरणात का होईना आयुक्त आपल्या गटातील आहे, हे सांगत सभागृहातील सर्वांना हसवलं.
 

Web Title: MLA Vishwanath Bhoir meet Bhausaheb Dangade commissioner of KDMC