१० मे : कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा; कपिल पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 05:39 IST2024-04-28T05:38:56+5:302024-04-28T05:39:32+5:30

भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली.

May 10: PM Modi's meeting in Kalyan; Information about Kapil Patil | १० मे : कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा; कपिल पाटील यांची माहिती

१० मे : कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा; कपिल पाटील यांची माहिती

कल्याण: कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांकरीता शुक्रवार, १० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार असल्याची माहिती भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या सभा होत आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात कल्याणमध्येही पाहावयास मिळणार आहे. २०१४ साली मोदी यांची कल्याणच्या फडके मैदानात सभा पार पडली होती.
 

Web Title: May 10: PM Modi's meeting in Kalyan; Information about Kapil Patil